राहाता : नगरविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले असून राजकारणातील कट्टर वैरी असणारे हे दोन दिगग्ज नेते एकमेकांच्या सुख दुःखात मात्र हजर असतात हे ह्या वरून दिसून आलं असून राजकारणा पेक्ष्या ही माणूस म्हणून माणूसपण जपून राजकारण करा हो मोठा संदेश देखील यातून जनतेसाठी दिला आहे.
प्रसंग जरी दुःखद असला तरी यातून आप आपल्या पक्ष्याच्या कार्य कर्त्यांनी यातून खूप मोठा बोध घेणं गरजेचं आहे.तळातील कार्यकर्ते एकमेकांच्या पक्ष्याला नेहमी पाण्यात पाहत तर असतात परंतु गाव पातळीवर तर अनेक जण एकमेकांचे तोंड ही पाहत नाही अश्या नेत्यांना आणि कार्यकर्त्याना हा मोठा संदेश बाळासाहेब थोरात यांनी दिला.

राजकारण वेगळं आणि माणूस पण वेगळं असा जणू संदेश त्यांनी दिला आहे. प्रसंग जरी दुःखद असला तरी ह्या दुःखद प्रसंगा तुन खूप मोठा सामाजिक संदेश जात असून .राजकारण आणि वैचारिक विरोध जरी असला तरी तो तिथे सोडून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे हाच खरा माणुसकी चा धर्म असून तो पाळणे गरजेचे आहे .हा संदेश नक्कीच बाळासाहेब थोरात यांनी जनतेला दिला आहे.
- ‘हा’ 229 रुपयांचा स्टॉक 330 रुपयांवर जाणार ! एक्सपर्ट म्हणतात आत्ताच खरेदी करा
- उद्या बँकांना सुट्टी राहणार ! मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार, RBI ची सुट्ट्यांची यादी पहा…
- कॅरिअर मायडीया कंपनीत महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग ! HR आणि वर्कमॅनवर गुन्हा दाखल
- प्रधानमंत्री सहाय्यता निधीत खा. लंके राज्यात अव्वल ! खा. लंकेंनी स्वतःसह शरद पवारांचाही कोटा संपविला
- महिन्याचा पगार 50 हजार रुपये असेल तर बँकेकडून तुम्हाला किती पर्सनल लोन मिळणार ? बँकेचे नियम काय सांगतात ?