जामखेड :- पुणे जिल्ह्यातून पाणी आणायचे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे आहे. हे काम पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. आम्हाला बाहेरचे उसने नको आहेत.
आमचेचं आम्हाला पाहिजेत. बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे. ज्यांनी दबावाचे राजकारण केले, राजकीय स्वार्थ पाहिला, जिल्ह्याचे पाणी अडवले,

त्यांना लोकसभा निवडणुकीत चपराक मिळाली, अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार व रोहित पवार यांचे नाव न घेता केली.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका प्रकल्पाचे भूमिपूजन नगरपरिषदेच्या वतीने मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, नगराध्यक्ष निखिल घायतडक,
गौतम उतेकर, सुभाष आव्हाड, राजश्री मोरे, कविता जगदाळे, सोमनाथ पाचारणे, डॉ. भगवान मुरूमकर, सोमनाथ राळेभात, सुधीर राळेभात, उद्योजक रमेश गुगळे, मनोज कुलकर्णी,
नगरसेवक महेश निमोणकर, अमित चिंतामणी, गणेश आजबे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत मिसाळ, स्कायलाइन डेव्हलपरचे संचालक दिलीप गुगळे, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख