…म्हणून राष्ट्रवादीने सुजयला उमेदवारी नाकारली

Published on -

श्रीगोंदे :- पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे ऐकेल अशांनाच ते उमेदवारी देतात. यापूर्वी बाळासाहेब विखे यांनी पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष केला.

उद्या सुजय विखे शेतकऱ्यांसाठी पुणेकरांशी दोन हात करेल. म्हणूनच मी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही सुजयला त्यांनी उमेदवारी नाकारली.

असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कुकडी आणि घोड धरणासह भीमा नदीला पाण्यासाठी पुणेकरांशी नेहमी संघर्ष करावा लागला. धरणे पुण्यात असली तरी पाणी शेतीसाठी देणे क्रमप्राप्त आहे.

विखेंनी सोमवारी आर्वी, अजनुज, कौठा, गार, पेडगाव, आनंदवाडी, लिंपणगाव व वाड्या वस्त्यांवर भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा प्रचारदौरा केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News