माझा भाजप प्रवेश हा काही आता मुद्दा राहिलेला नाही – राधाकृष्ण विखे

Published on -

संगमनेर :- मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मंत्रिपद स्वीकारण्यास मी तयार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू असल्याने भाजप प्रवेश केवळ औपचारिकता राहिल्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी सांगितले.

काँग्रेस नेत्यांनी आता स्वत:हून बाजूला होत नव्यांना संधी देण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता अंगुलीनिर्देश केला.

एका खासगी कार्यक्रमासाठी संगमनेरमध्ये आलेले विखे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तारात मिळणाऱ्या संभाव्य पदाबाबत छेडले असते ते म्हणाले,

माझा भाजप प्रवेश हा काही आता मुद्दा राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दिवस कोणता असेल आणि कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.

काही दिवसांपूर्वीच आपण विराेधी पक्षनेतेपदाचा आणि आमदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. काँग्रेसने पक्षात आपली कोंडी केली, तेथे आपली घुसमट होत होती, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!