संगमनेर :- काँग्रेसला व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना? असा खोचक सवाल गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना केला.
‘वर्षानूवर्षे केवळ मुठभर लोकांचा विकास करून गोरगरीब व गरजवंताना विकासापासून जाणिवपूर्वक वंचित ठेवले. भुलभुलैयावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यांना कामं करणारी माणसं हवी आहेत.
आंभोरे येथे युती सरकारने मंजूर केलेल्या सुमारे दोन कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
निळवंडे प्रश्नांवर बोलताना विखे म्हणाले, ‘निळवंडे कालव्यांची कामे सुरू झाल्याने लोकांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला.
पिचडांच्या सहकार्याने सुरू झालेली कालव्यांची कामे पूर्ण करून दीड वर्षात उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी देण्याचे सरकारचे धोरण आहे. यासाठी १२०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे.
सामान्य माणसासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेचे भक्कम पाठबळ सरकारला आहे. राज्यात काँग्रेसचे आमदारच निवडून नाहीत, अशी परिस्थिती असेल तर, तर या तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून देऊन उपयोग काय?
युतीचा आमदार निवडून गेला तरच पंचवीस वर्षे प्रलंबित कामे मार्गी लागतील. त्यामुळे युतीच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा प्रश्न सोडविण्याची हमी मी घेतो.’
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये…