शिर्डी :- आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार चांगले काम करत आहे. जनतेचा विश्वास सरकारवर आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही कायम राहील,
असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यापेक्षा महायुतीचाच होईल, असा दावाही त्यांनी केला.
शिर्डी येथे मंत्री विखे यांनी गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर साई समाधीचे दर्शन घेतले. पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशातील आणि राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली.
राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठे यश मिळाले. सरकारचे चांगले काम सुरू असल्यामुळेच जनतेने महायुतीला पाठबळ दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा वेगळे निकाल नसेल, २२० जागांचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
- देशातील टॉप 10 लॉ कॉलेजची यादी जाहीर! मुंबई, पुण्यातील महाविद्यालयांचा कितवा नंबर ?
- लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 344 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता, खात्यात कधी जमा होणार ?
- राजधानी दिल्लीहून ‘या’ तीन शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ! दिवाळीच्या आधीच प्रवाशांना मिळणार भेट, महाराष्ट्राला मान मिळणार का ?
- 30 गुंठ्यात 9 लाख रुपयांच उत्पन्न ! अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं, आल्याच्या शेतीने बनवलं मालामाल
- मारुती स्विफ्ट खरेदी करणाऱ्यांसाठी Good News ! Swift च्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात