नामांतराच्या वादावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-शहरांची नामांतरावरून राजकीय युद्ध पेटू लागले आहे. राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून या मुद्दयाला धार लावून प्रचार केला जात आहे.

मात्र आता याच मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शःब्दिक युद्ध जुंपले आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करायला काँग्रेसचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.

यावरून विरोधी पक्ष भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. आघाडीत बिघाडी? औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर सध्या काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमक सुरू आहे.

काँग्रेसचे औरंगजेब नाही तर छत्रपती आराध्य असतील या शिवसेनेच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि श्रद्धास्थान आहे. या बाबतीत शंका बाळगण्याचे कारण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

खासदार राऊतांच्या प्रश्नाला महसूलमंत्र्यांचे प्रत्युत्तर औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असं करावं, या शिवसेनेने केलेल्या मागणीला आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसने मात्र विरोध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाज महाराज आमचे दैवत आहेत.. शहराचं नाव बदलल्याने सामान्यांच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? असा सवाल उपस्थित करत ज्यावेळी आपण महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे

त्यावेळी सर्वसामान्य माणूस केंद्रभूत मानत त्याच्यासाठी काय चांगलं करता येईल हे काम आपल्याला करायचे आहे,’ असं उत्तर बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांना दिलं आहे.