प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढल्या; घरात सापडले चक्क ‘ह्या’ देशातील क्रेडिट कार्ड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (ED) ने पुन्हा एकदा सरनाईक यांना समन्स बजावला असून १३ डिसेंबरपासून चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने धाड टाकली त्यावेळी पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड सापडले. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावला आहे.

ईडीने याबाबत फेअरमाउंट बँक कॅलिफोर्नियाला पत्र लिहीत पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या संदर्भातील स्टेटमेंट मागवले आहे. या पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे. पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे.

हे कार्ड फेअरमाउंट, कॅलिफोर्निया इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment