पोलीस अधिकारी असल्याचे भासवत भामट्याने दोन तोळे लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दरदिवशी चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

तसेच खोटी माहिती देत लुटमारीच्या घटनांमध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे.असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, दशरथ उर्फ युवराज रामजी शिंगाडे (रा. जवळा, हल्ली रा. म्हसे खुर्द) हे जवळा येथून मेडिकलमधून औषध घेऊन त्यांच्या बंधूंच्या घरी जात असताना

त्यांच्या जवळ एक काळ्या रंगाची दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी आम्ही पोलीस आहोत, असे सांगून त्यांची अंगझडती घेतली. तुमच्या वस्तू तुम्हाला परत देतो, असे सांगून झडती घेतली.

त्याला त्याच्या सर्व वस्तू परत दिल्या. मात्र यात हातचलाखी करीत शिंगाडे यांची सोन्याची चैन व अंगठी असा सुमारे 50 हजारांचा ऐवज घेऊन भामट्यांनी घेऊन पोबारा केला.

या बाबत शिंगाडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिस असल्याचे सांगून अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment