अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न खूप काळापासून प्रलंबित असून या कामगारांची अक्षरशः उपासमार होत आहे.
या संदर्भात कामगाराच्या एका मुलाने दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर तक्रार करून लक्ष वेधले होते. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालत

शनिवारी नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कारखाना व्यवस्थापनाला त्या संदर्भात लेखी आदेश दिले आहेत. या आदेशात ‘तीन दिवसात सर्व थकीत वेतन अदा करुन, त्याचा अहवाल पाठवावा’ असे म्हटले आहे.
त्यामुळे या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटण्याची अशा आहे. तनपुरे साखर कारखान्याचे कामगार चंद्रकांत कराळे यांचा मुलगा निखिल याने दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर तक्रार केली.
त्यात म्हंटले की, कारखान्याच्या कामगारांचे ५० महिन्यांचे वेतन थकले. अनेकदा आंदोलने करूनही, वेतन देण्यास टाळाटाळ केली जाते. कामगारांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले.कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थितीत कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे आहेत. प्रधानमंत्री यांनी हस्तक्षेप करून, कामगारांना थकित वेतन मिळवून द्यावे.” असे तक्रारीत म्हंटले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®