पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या अश्या शुभेच्छा..

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर कोरोनाच्या नियमांचं पालन करत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा,

तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही पवारांवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत.

खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या,

हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!