पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा : भारतासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा आहे, असं मोदी म्हणाले.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे,२० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज आहे.

२० लाख कोटींचे हे पॅकेज आत्मनिर्भर भारतासाठी गती देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे, तसेच हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या १० टक्के इतके आहे.

या पॅकेजमध्ये जमीन, कामगार यावर लक्ष देऊन बनविण्यात आले आहे. यामध्ये कुटीर उद्योग, लघू, मध्यम उद्योग यासाठी आहे. हे पॅकेज देशाच्या श्रमिक, शेतकऱ्यासाठी आहे, असे मोदींनी सांगितले.

२१ वं शतक हे भारताचं आहे हे आपण गेल्या शतकभरापासून ऐकत आलो आहे. करोना संकटामुळे जगभरात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याकडे भारताचं पूर्ण लक्ष आहे. जगभरात ४२ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं.

आत्मनिर्भर भारत म्हणजे संपूर्ण विश्वाची चिंता असंही मोदींनी स्पष्ट केलं. भारतात जेव्हा करोनाची साथ आली तेव्हा एकही पीपीई किट भारत तयार करत नव्हता.

सध्याच्या घडीला भारत रोज २ लाख पीपीई किटची निर्मिती करतो आहे. ही बाब अत्यंत अभिमानाची आहे.असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment