जामखेड :- तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि. प. शाळेचा (दत्तवाडी) मुख्याध्यापक संभाजी कोंडीबा सरोदे (राहणार जामखेड) याने नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
न्यायालयाने त्यास २६ पर्यंत पोलिस कोठडी दिली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता सरोदे नान्नजहून जामखेडकडे कारने येत होता. राजेवाडीफाटा येथे त्याच्या शाळेतील विद्यार्थिनी रस्त्याच्या बाजूला घरासमोर खेळत होती. सरोदेने तिला हाक मारली. विद्यार्थिनी विश्वासाने त्याच्याबरोबर गेली.
त्याने तिला कारमध्ये बसवले. राजेवाडी येथील शाळेत तो तिला घेऊन गेला. अश्लील व्हीडिओ दाखवत सरोदेने तिच्याशी अश्लिल चाळे केले. मुलीने घरच्यांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. सरोदे कारमधून पळून जात असताना ग्रामस्थांनी त्यास पकडले. चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरोदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक केली.