कोरोना चाचणीविनाच कैदी जेलमध्ये दाखल; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी कारागृहातील कैदी, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. या घटनेस पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला होता.

एवढे होऊनही आता त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय चाचणीबरोबर कोरोना तपासणी करण्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ठ आदेश दिला होता.

मात्र पोलीस प्रशासनाने वरिष्ठांचा आदेश धुडकावत पुन्हा एकदा राहुरी कारागृहात आपला मनमानी कारभार केला आहे. यामुळे पुन्हा एकदा एक कैदी कोरोनाबाधित आढळून आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, चिंचोली फाटा येथे एका हॉटेलमध्ये घातक शस्त्राने एका तरुणाला गंभीर मारहाण प्रकरणी चार दिवसांपूर्वी राहुरी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली.

त्यांची कोरोना तपासणी करण्यापूर्वी, त्यांना कारागृहातील बरॅकमध्ये ढकलण्यात आले. त्यांनी बरॅकमधील इतर कैद्यांबरोबर २८ सप्टेंबरची रात्र काढली. २९ सप्टेंबरला त्यांची कोरोना चाचणी झाली.

त्यात, एक आरोपी पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे, राहुरी पोलिस ठाण्यात पुन्हा धावपळ उडाली. कोरोनाबाधित आरोपीला रुग्णवाहिकेतून नगर येथे जिल्हा कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले.

मागील महिनाभरात अशाच प्रकारामुळे आतापर्यंत ३७ कैदी व १२ पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तरी, त्याच चुकांची पुनरावृत्ती घडत असल्याने पोलिस वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.

राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या हटवादी स्वभावामुळे राहुरी कारागृहातील कैदी व सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव वारंवार धोक्यात येत आहे. त्यामुळे, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe