अभिमानास्पद ! थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरेंचे नाव समाविष्ठ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे. पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत सामावेश करण्यात आला आहे.

सरकारने जारी केलेल्या या यादीत एकूण 41 थोर व्यक्तींचा समावेश आहे. 2021 मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत राज्य सरकारने 15 डिसेंबर 2020 रोजी परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांचे जयंती किंवा राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यायलायत साजरे करण्यात येणार आहेत.

या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव आहे. दरम्यान आपल्या भाषणाची शैली व आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रासह देशात आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारे हिंदू हृदयसम्राट दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचा या यादीत समावेश झाल्याने नेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe