एसटी अपघातातील प्रवाशांना भरीव मदत द्या : आमदार डॉ. सुधीर तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- एसटी अपघातातील प्रवाशांना मिळणारी वैद्यकीय मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या अपघातग्रस्तांसाठी भरीव मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधीद्वारे सूचना मांडताना ते म्हणाले, सर्वसामान्य जनता एसटीने प्रवास करत असते. अपघात झाल्यास एसटी महामंडळाकडून २३ हजारांची मदत दिली जाते.

ही मदत अतिशय कमी असल्याने नागरिकांना दिलासा मिळावा, याकरता शासनाने या अपघातग्रस्तांसाठी भरीव मदत निधी द्यावा, असे तांबे यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment