बेळगाव : वडील आपल्याला पबजी खेळू देत नाहीत, याचा राग आल्याने चिडलेल्या एका निर्दयी मुलाने चक्क जन्मदात्या वडिलांवर हल्ला चढवत त्यांचे तुकडे करून हत्या केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे कर्नाटकातील बेळगावधील काकती येथे घडली आहे.
याप्रकरणी रघुवीर कुंभार नामक तरुणास अटक केली आहे.कर्नाटकातील बेळगावमधील काकती येथे असलेल्या सिध्देश्वरनगरात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत रघुवीर पबजी गेम खेळत बसला होता. यावेळी वडिलांनी त्याला मोबाईल ठेव असा सल्ला दिला.

परंतु यानंतरही तो हा गेम खेळतच राहिला. तेव्हावडिलांनी त्याच्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेतला. यानंतर रागाच्या भरातच रघुवीर झोपण्यासाठी गेला. त्याने प्रथम आई झोपलेल्या खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावली आणि तिला कोंडले.
यानंतर घरात असलेल्या विळ्याने वडिलांवर हल्ला चढवला. त्याचा राग इतका अनावर झाला होता की त्याने रागाच्या भारत वडिलांचे तीन तुकडे केले. मृत वडिलांचे नाव शंकर देवाप्पा कुंभार असल्याचे कळते.रघुवीर हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता.
त्याचे शिक्षणात लक्ष लागत नव्हते. मोबाईल गेमच्या सवयीमुळे तो तीन वेळा नापास झाला होता. यामुळे आई-वडील खूप दु:खी होते. रघुवीरचे वडील पोलीस दलातून तीन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले होते. रघुवीर हा सतत नापास होत असल्याने बेरोजगार होता.
त्यामुळे तो घरीच बसून मोबाईलवर गेम खेळत असे. अशातच वडीलही सेवानिवृत झाले होते. तेही घरी बसून रहात, तेव्हा त्यांना मुलगा फक्त गेम खेळताना दिसायचा. यावरून अनेकदा मुलगा आणि वडिलांत भांडणेही होत होती. या भांडणाचा शेवट सोमवारी वडिलांच्या हत्येने झाला आहे.
- Ahilyanagar Police : एलसीबी प्रवेशासाठी सुरु आहेत राजकीय भेटीगाठी ! जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढ मिळणार ? पे स्केल नुसार संभाव्य पगार वाढ जाणून घ्या
- डोक्यावर ५ किलोची गाठ… डॉक्टरांनी केला चमत्कार ! तरुणाला साई हॉस्पिटलमधून मिळाले दुसरे जीवन
- डॉक्टर-इंजिनिअरचं स्वप्न विकलं जातंय फसव्या Apps मधून ! पालकांसाठी गंभीर इशारा
- कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! मारुती सुझुकीच्या या लोकप्रिय कारवर मिळणार 70,000 रुपयांचा डिस्काउंट, कधीपर्यंत सुरू राहणार ऑफर?