पुणे :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विनोद नवबहादूर भंडारी (३४, रा. गोऱ्हे बुद्रुक, हवेली, पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने आपली पत्नी तलाशी विनोद भंडारी (२५) हिचा खून केला होता.
याप्ररकणी बाळासाहेब नामदेव जावळकर यांनी हवेली फिर्याद दिली होती. दि. ९ ऑक्टोबर २०१२ रोजी ताराई गेस्टहाऊस येथे मध्यरात्री हा गुन्हा घडला.
घटनेच्या दिवशी त्यांच्या ओळखीचे प्रकाश पुरी आणि हेमंत लिंबू त्यांच्या घरी आले होते. सकाळपासूनच दोघांमध्ये भांडणे सुरू होती. त्यानंतर रात्री तिघे दारू प्यायले.
दारू पिणे झाल्यानंतर विनोदने दरवाजा बंद करून घेऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा डोक्यात हत्याराने वार करून तिचा खून केला.
दोन्ही बाजुंचा युक्तिवाद एकल्यानंतर न्यायालयाने विनोद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Latest News Updates
- देवेंद्र फडणवीसांनी रचले ‘हे’ तीन विक्रम
- ती जेव्हा – जेव्हा शेतात जायची तेव्हा-तेव्हा तिच्यावर बलात्कार व्हायचा…!
- भगतसिंह कोशारींची होणार हकालपट्टी, कलराज मिश्र होणार नवे राज्यपाल?
- प्रेमासाठी वाट्टेल ते…पाकिस्तान सोडून आली भारतात, लग्नही केलं, नंतर….
- पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर