Pune Expressway Update:- पुणे शहर व परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून अनेक ठिकाणी महत्वाच्या अशा पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू आहेत.
पुणे शहर व परिसराचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या कायमचा निर्माण होत असल्यामुळे पुणे रिंग रोड सारखा प्रकल्प हाती घेण्यात आला असून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या रिंग रोडचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
पुणे शहरासोबतच जर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणच्या नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव तसेच चाकण शिक्रापूर व पुणे शिरूर या तीनही महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते व त्यामुळे नागरिक कायमच त्रस्त असतात.
परंतु आता या वाहतूक कोंडीच्या समस्येपासून मुक्तता मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण या तीनही महामार्गांच्या 19192 कोटींच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील या तीन राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या 19192 कोटींच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
आता या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पुणे ते नगर महामार्गावर कायमच होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे प्रयत्न सुरू होते
व त्यांना आता या माध्यमातून मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे ते शिरूर या तीनही महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधकामाच्या निविदा प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
कसा असणार या तिन्ही मार्गावरील एलिव्हेटेड कॉरिडोर?
यामध्ये पुणे ते सातारा महामार्गावरील दुमजली पूल, हडपसर ते यवत उन्नत मार्ग, पुणे शिरूर 56 किलोमीटरचा एलिव्हेटेड मार्ग, तळेगाव- शिक्रापूर- चाकण हा 54 किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा ते खेड( चांडोली ) मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून आता टेंडर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
पुणे ते अहमदनगर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी….
वाघोली ते शिरूर दरम्यानच्या सध्याच्या पुणे ते अहमदनगर मार्गावर होणारे प्रचंड वाहतूक कोंडी सुटावी याकरिता रामवाडी- वाघोली ते शिरूर दरम्यान 56 किलोमीटरच्या दुमजली पुलासह अठरा पदरी महामार्ग तयार होणार.
कसे असणार महामार्गाचे स्वरूप?
यामध्ये तीन मार्ग असणार असून यातील जो काही रस्ता आहे तो 6 पदरी असणार आहे व त्यावर दुमजली पूल उभारला जाणार असून या पुलावर देखील प्रत्येकी सहा सहा लेन असणार आहेत. हा रस्ता एकूण 18 लेनचा होणार आहे. त्यामुळे पुणे ते शिरूर आणि शिरूर ते अहमदनगर हे अंतर देखील कमी होणार आहे.