मुंबई :- राज्याचे विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे .
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधीमंडळात जाऊन विखे – पाटील यांनी राजीनामा दिला.

दरम्यान विखे पाटलांच्या राजीनाम्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीचा प्रचार करणं देखील टाळलं होतं.
त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश केव्हा होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण, लवकरच राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.
आता आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांचा भाजप प्रवेश हा जवळपास निश्चित झाला आहे.
काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण आज राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं होते.
कॉंग्रेस पक्षाने माझी कोंडी केली आहे. काँग्रेसमध्ये माझी घुसमट होत आहे. आज विधानसभा अध्यक्षकडे राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढा खासदार रणजित निंबाळकर यांच्यात आज बैठक झाली त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती.
पालकमंत्रीपदाची जबाबदारी विखेंवर देण्याची शक्यता
काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री करण्याची हालचाल भाजपनं सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता पुण्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.