अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच न्यायालयाने स्थगिती लावल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली आहे.
‘राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणार्या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतयं, हे दुर्देव आहे,’ मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी धरसोड झाली, त्याचा परिणाम म्हणजे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली.
आता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे हे प्रकरण जाणार आहे. परंतु मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन यामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
तरच सरकार वटणीवर येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विखे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेतली.
त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आपले मत मांडले. पुढे बोलताना विखे म्हणाले कि, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार अजिबात गंभीर नाही.
सरकार हे वेळकाढूपणा करीत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही, त्यांना आरक्षण द्यायचे नाही, असे म्हणत विखेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved