नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी प्रचार करणार नाहीत. राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. वायनाड या मतदारसंघापुरतंच ते स्वत:ला सीमित ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर राहुल गांधी नाराज असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकससभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. मात्र दुसरीकडे राहुल गांधी नाराज असल्याचे देखील समजते.

राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सहकार्य केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच जे निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचे होते ते देखील घेतले दिले जात नव्हते असेही सूत्रांकडून कळले आहे.
राज्यात एकीकडे शरद पवार निवडणूक प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळते आहे. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच मैदानात उतरणार असल्याची माहिती होती. 2 ऑक्टोबरला वर्ध्यातील गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करणार होते, मात्र ते तिथंही आले नव्हते.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













