अहमदनगर लाईव्ह 24 टीम : – सोसायटीचा ठराव घेऊ नये, यासाठी सोसायटीचे सचिवाचे अपहरण करून कोंडून ठेवण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली.याप्रकरणी जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे, श्रीगोंदा उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

दरम्यान कुकडी साखर कारखाना वाचवण्याच्या भितीने जिल्हा बँकेत जाण्यासाठी आपल्याला अडचण येवू नये यासाठी माजी आ. राहूल जगताप यांनी राजकीय ताकद वापरून आमच्यावर सुडबुध्दीने व गैरमार्गाने गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केला आहे.
हे पण वाचा :- वेबसाईटद्वारे चालविण्यात येणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त !
याबाबत पानसरे यांनी प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, दि.१२ जानेवारी रोजी कोथूळ सोसायटीचा ठराव झाला होता. तो ठराव आपल्या विरोधात जाईल म्हणून तडकाफडकी जून्या सचिवाचा राजीनामा घेवून तो सहाय्यक निबंधकाकडे पाठवला.
हे पण वाचा :- आईने केली मुलीसह आत्महत्या, मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल !
मात्र माजी आमदार राहूल जगताप यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावत रेणूकादेवी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव राजेेंद्र खोल्लम यांच्या नियुक्तीचा आदेश दिला. व त्यांना मिटिंगला गैरहजर ठेवले. तरी या अपहरणाशी आपला काही एक संबंध नाही, असे या पत्रकात नमुद केले आहे. अशा प्रवृत्तीला शेतकर्यांनी व सभासदांनी जागा दाखवू द्यावी असेही आवाहन पानसरे यांनी केले आहे.
हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….