विवाहितेस विष पाजून खुनाचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

राहुरी :- पैशांच्या कारणातून विवाहित तरुणीस विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील भुजाड़ी इस्टेट मल्हारवारी रोड मुथा कुटुंबीय वास्तव्यास आहे,

विवाहित तरुणी सौ. संजना श्रीपाल मुथा, वय २९ हिला तिचा नवरा श्रीपाल चंदनमल मुथा याला बँकेची हप्ते भरण्याचे पैसे मागितले असता तो म्हणाला की, पैसे देणार नाही. तुला नांदविणार नाही,

असे म्हणून शिवीगाळ करुन सासु बबिता चंदनमल मुथा, सासरा चंदनमल मुथा यांनी विवाहितेस मारहाण केली, व शिवीगाळ करत धमकी दिली.

याबाबत दिलेल्या तक्रारीत विवाहितेने म्हंटले आहे कि, आरोपी नवरा श्रीपाल चंदनमल मुथा याने विषाची बाटली घेवून मला खाली पाडून तोंडात जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान यात गंभीर स्थितीत संजना यात गंभीर स्थितीत संजना श्रीपाल मुथा या विवाहित तरुणीस नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

तिने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी नवरा श्रीपाल चंदनमल मुथा, चंदनमल मुथा, बबित चंदनमल मुथा, रा, कोल्हार भगवती, ता. राहाता, हल्ली रा. भुजाडी इस्टेट मल्हारवाडी रोड, राहुरी यांच्याविरुद्ध शहरी पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment