शाळेमध्ये जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा दोघांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

राहुरी : – बारागाव नांदूर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा दोघांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला.

राहुरी पोलिसात राजमोहम्मद उमर शेख वय वर्ष ५० धंदा नोकरी उर्दू शाळा शिक्षक यांच्या फिर्यादीवरुन आज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुरूवारी रोजी मुस्कान, वय (१३) ही इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी जिल्हा परिषद उर्दू शाळेकडे जात होती.

त्याचवेळी पाठीमागून दोघांनी मुलीचा पिछा सुरू केला. दोघांनीही तोंडाला रूमाल बांधलेले होते.

दोघांनी दुचाकी थांबवत मुलीचा हात ओढण्याचा प्रयत्न केला असता मुलीने हातातील दप्तर फेकून देत लगतच असलेल्या घराकडे धाव घेतली.

मुस्कान हिने घरात झालेला प्रकार सांगताच पालक व काही ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. तात्काळ उर्दू शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधत पोलिसांना कळविण्यास सांगितले.

यावेळी शेकडो ग्रामस्थांची गर्दी जमा होऊन तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली.

तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराजे पवार, सरपंच निवृत्ती देशमुख, प्रभाकर गाडे, उपसरपंच युवराज गाडे, एमआयएमचे इमान देशमुख, गोविंद जाधव, विनोद पवार, सेनेच बाळासाहेब गाडे,

श्रीराम गाडे, भाऊसाहेब कोहकडे, जब्बार काकर, नवाज देशमुख, मुन्नाबी मिझा, आरीफ देशमुख यांसह ग्रामस्थांनी चर्चा करीत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे अशी मागणी केली.

घटनेनंतर पोलिसांसह गावातील तरूणांनी संपूर्ण गावाच्या परिसरात फेरफटका मारीत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु आरोपींचा तपास लागला नाही. आरोपी हे पूर्ण तोंडाला रूमाल बांधून आले होते. मुलीसह लगतच्या महिला ग्रामस्थांनी आरोपीला पाहिले असल्याचे सांगण्यात आले.

पोलिस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर आरोपींचा शोध घेणार असल्याचे सांगितले.

शालेय विद्यार्थीने अपहरणाचा प्रकार घडल्याने पालक वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment