विवाहितेचा खून करणाऱ्या पिता-पुत्राला जन्मठेप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. पती गोविंद सर्जेराव हारदे (वय ३८), सासरा सर्जेराव हारदे (रा. राहुरी, तुळापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१३ मध्ये वैशाली हारदे हिचा खून करण्यात आला होता.

या खटल्यात सरकारी वकिल केदार केसरकर यांनी दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. साक्षीदारांची साक्ष, दाखल कागदपत्रे, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.

तर सासूविरुद्ध पुरावे नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लग्न झाल्यानंतर दोन मुली व एक मुलगा झाल्यानंतर वैशाली हारदे हिचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. माहेरून चारचाकी गाडी आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment