मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

Published on -

राहुरी :- शुकवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व जाहीर सभा होणार असून, यावेळी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथील महाजनादेश यात्रा व जाहीर सभेबाबत माहिती देताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, राहुरी मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून निळवंडे कालवा, रस्ते, पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे.

त्यांचा हा दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. राहुरी येथे शुकवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता मुख्यमंर्त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असून,

महाजनादेश यात्रा नगर-मनमाड रस्त्याने राहुरी येथील वाय.एम.सी. ग्राऊंड येथे पोहोचल्यानंतर जाहीर सभा होणार आहे, असे आ. कर्डिले यांनी सांगून यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News