अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशातील कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर बोलताना मरकजच्या घटनेतील लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे.
या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे,’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दिल्ली मध्ये झालेल्या तबलिगी मरकजमध्ये सहभागी लोकांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलीच टीका करत त्यांचा समाचार घेतलाय.
जनतेला नम्र विनंती आहे लॉकडाउनला गांभीर्याने घ्या. जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत.
लॉकडाऊन वाढवला गेला तर त्याचा परिणाम उद्योग धंद्यांना होईल,’ अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
तसेच पंतप्रधानांच्या भाषणातून आशेचा किरण दिसायला पाहिजे होता. देशातील रुग्णांची स्थिती काय आहे,
बाकी त्यांच्यावरील उपचारांची स्थिती काय आहे, गरिबांच्या अवस्था बिकट झाली आहे,
याबाबत त्यांनी भाष्य करणं अपेक्षित होतं,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com