अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-आपल्या रोखठोक भाषणांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच चर्चेत राहतात. यातच राज ठाकरे यांनी सफाई कामगारांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
टेनिस खेळण्यासाठी शिवाजी पार्कवर आलेल्या राज ठाकरेंसोबत अनेकांनी फोटो काढले. मात्र यावेळी सफाई कामगारांसोबतच्या त्यांची फोटोची चर्चा सर्वाधिक आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिटनेसकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष देताना दिसत आहे.
राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कात टेनिस कोर्टात खेळताना दिसून येत आहेत. राज ठाकरे नेहमीप्रमाणे टेनिस खेळायला गेले असताना राज ठाकरेंकडे फोटो काढण्याची शिवाजीपार्क परिसरात काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी विनंती केली होती.
राज ठाकरेंनीही यावेळी त्यांच्या विनंतीचा मान राखत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून दिलखुलासपणे फोटो काढला.
याबाबत मनसे नेते सचिन मोरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. माणूसकी जपणारा संवेदनशील नेता, असे सचिन मोरे यांनी त्यात म्हटले आहे.
खरंतर सफाई कर्मचारी हा कायमच दुर्लक्षित राहिलेला घटक. परंतु कोरोनाच्या महामारीत सफाई कर्मचारी कोविड योद्धा म्हणून काम करत आहेत.
दिवसरात्र ते शहर स्वच्छ ठेवून कोरोनाव्हायरला आळा घालत आहेत. त्याच सफाई कर्मचाऱ्यांनी जेव्हा राज ठाकरेंना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली, तेव्हा तेही कोणताही विलंब तयार झाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved