राज्यात फक्त इतकंच रक्त शिल्लक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीमुळे रक्तदान करणाऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र आहे. रक्तदान करायला गेलं, तर कोरोनाची लागण होईल या भीतीने अनेक रक्तदाते रक्तदान करणं टाळत असल्याचं चित्र आहे.

मात्र रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक संख्येनं रक्तदानासाठी पुढे यावं, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. महाराष्ट्रात रक्ताचा साठा कमी झाला असून एक दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आता उरला असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीनं ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीमुळे रक्तदान करणाऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र आहे. रक्तदान करायला गेलं, तर कोरोनाची लागण होईल या भीतीने अनेक रक्तदाते रक्तदान करणं टाळत असल्याचं चित्र आहे. मात्र रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक संख्येनं रक्तदानासाठी पुढे यावं, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

राज्यात सध्या केवळ २० हजार युनीट रक्त उपलब्ध आहे. साधारण एका दिवसाला २० हजार युनीटची मागणी असते. त्यामुळे सध्याचा रक्तसाठा हा एक दिवस पुरेल एवढाच असल्याचं चित्र आहे. लवकरात लवकर राज्यातील रक्तसाठा वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाधिक रक्तदात्यांनी पुढं येऊन रक्तदान करावं, असं आवाहन करण्यात आलंय.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment