VIDEO NEWS : राम शिंदेंच्या फ्लेक्‍सबाजीवर सोशल मीडियातून टीका

Ahmednagarlive24
Published:

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील कर्जत-जामखेड तालुक्‍यातील गावागावात विकास कामांचा हिशोब देणारे फ्लेक्‍स लावले आहेत. 

यामध्ये गेल्या दोन टर्ममध्ये केलेल्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे. मात्र अपूर्ण कामे, कामांचा निकृष्ट दर्जा आदी मुद्दे घेत या फ्लेक्‍सबाजीवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

ना. शिंदे यांनी गावागावातील विविध कामांवर कोट्यवधी रुपयांच्या निधीचा कालावधीनिहाय लेखाजोखा फ्लेक्‍समधून मांडला आहे. 

“काम दमदार राम शिंदे पुन्हा आमदार’ अशी टॅगलाईन फ्लेक्‍सवर झळकत आहे. गावागावातील दर्शनी भागात मोठ्या आकाराचे हे फलक लावण्यात आलेले आहेत.

फलक लावल्यापासून ग्रामस्थांनी फलकावरील विकास आणि गावात प्रत्यक्ष झालेली कामे याची शोधाशोध करायला सुरुवात केली आहे. 

कामांचे भूमिपूजन झाले मात्र काम सुरू नाही, अर्धवट अवस्थेतील बंद कामे, निकृष्ट दर्जाची कामे अशा अनेक मुद्‌द्‌यावर गावात चर्चा सुरू आहे. 

काही गावात तर ग्रामस्थांना झालेल्या काही कामांचा अद्यापही तपास लागलेला नसल्याचे सोशल मीडियातील प्रतिक्रियेतून दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment