अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक : दूध देण्याचा बहाणा करून महिलेचे व तिच्या पतीचे फोटो वायरल करण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दिलीप जाधव (वय ४०) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जाधवने कच्चे दूध देण्याचा बहाणा करत घरात प्रवेश केला.
यावेळी पीडित महिलेचा मोबाईल मधील पतीचे व महिलेचे फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाईल मध्ये घेऊन वायरल करण्याची धमकी दिली.
यानंतर दि. ०१ जून ते ३१ डिसेंबर दरम्यान वेळोवेळी अनेक ठिकाणी अत्याचार केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.