मानवजातीला काळिमा फासणारी घटना; नराधम मुलाने सख्ख्या आईलाही बनवले वासनेचे शिकार

Ahmednagarlive24
Published:

औरंगाबाद : मानवजातीला काळिमा फासणारी ही घटना कोणीही कधीही असा विचार केला नसेल. कारणं नराधम मुलाने स्वत:च्या आईवर बलात्कार केल्याची घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या एका २० वर्षीय नरपशूने आपल्या सख्ख्या आईलाच वासनेची शिकार केले.

गेले तीन महिने तो हे हीन कृत्य करीत होता. अखेर मंगळवारी झालेल्या अत्याचारानंतर या पीडित मातेने औरंगाबाद सिडको पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणाची फिर्याद नोंदवली.

सात वर्षांपूर्वी पतीचे निधन झालेल्या या महिलेने चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नाेकरी करीत आपल्या चार अपत्यांना वाढवले. दोन मुली आणि दोन मुले. दाेन्ही मुली बाहेरगावी असतात.

यातला मुलांमधला हा नरपशू मोठा. कामधंदा आणि शिक्षणही न करता दारूच्या आहारी गेलेला हा तरुण दीर्घकाळापासून दारूसाठी पैसे द्यावेत म्हणून आईला मारहाण करीत होता.

गेल्या तीन महिन्यांपासून तर त्याने आपल्या आईलाच वासनेची शिकार केले आहे. पण भीती आणि आपलीच बदनामी होईल या चिंतेने ती तो अत्याचार सहन करीत आली.

मंगळवारच्या अत्याचारानंतर मात्र तिने हिंमत करून पोलिस ठाणे गाठले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment