अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सातारा : छत्रपती घराण्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या खा. संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी सातारकरांनी गुरुवारी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला होता.
बंदमध्ये सर्वच सातारकर सहभागी झाल्याने गुरुवारी साताऱ्यातील बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बंददरम्यान माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी शहराच्या विविध भागात एकवटत खा. संजय राऊत तसेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला.
निषेध करण्यासाठी उदयनराजेप्रेमींनी खा. राऊत आणि मंत्री आव्हाड यांच्या प्रतिमा असणारे फलक गाढवावर लावत त्याची मिरवणूक काढली. खा. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याला टार्गेट करत थेट उदयनराजे यांच्यासह छत्रपती घराण्यातील इतर वारसांना आव्हान देत त्याबाबतची वक्तव्ये केली.