अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लॉकडाऊनमुळे गरीबांची जीवनावश्यक वस्तूंसाठी परवड होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन महिन्यांचे अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी केंद्राने महाराष्ट्राला २० लाख टन धान्य साठा दिला असून, राज्य सरकारने वितरणासंदर्भात काढलेल्या परिपत्रकातील जाचक अटी तात्काळ रद्द करुन नागरिकांना तीन महिन्यांचे नियमित व मोफत धान्य एकत्रितरित्या वितरीत करावे, असे आवाहन केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे.

जालना शहरातील गोरगरीब तसेच गरजूंना केंद्रीयमंत्री दानवे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, भास्कर दानवे आदी उपस्थित होते. यावेळी दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात अंत्योदय अन्नधान्य योजनेचे २५ लाख ५ हजार ३०० कुटूंब असून एक कोटी आठ लाख लाभार्थी आहे.
तर प्राथमिकता कुटूंब योजनेत ९२ लाख १६ हजार कुटूंबांचा समावेश असून यात एक कोटी ३७ लाख लाभार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो दराने प्रत्येकी पाच किलो गहू व तांदूळ दिला जातो. या निर्णयाचा गरीबांंना मोठा फायदा होणार आहे, परंतू राज्य सरकारने परिपत्रक काढून एका महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाबने सहा तर ओडिसात दोन महिन्यांचे धान्य एकत्रित दिले जात आहे. महाराष्ट्रातही यापूर्वी दोन महिन्यांचे धान्य एकत्रितरित्या देण्यात आले आहे. केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, म्हणून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारला विनंती केली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com