अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-मागील काही दिवसांपासून राज्यातील काही बँकाच्या आर्थिक घोटाळ्यानंतर त्यांचा परवाना आरबीआयकडून रद्द करण्यात आला आहे.
त्यातच आता राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरबीआयने उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द केल्याने खळबळ उडाली आहे.
आरबीआयने सोमवारी याची माहिती दिली. बँक सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे खातेदारांचे, ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकणार नाही. या बँकेचे लायसन सोमवारी व्यवहार संपल्यानंतर रद्द होणार आहे.
यानंतर ही बँक कोणतेही व्यवहार करू शकणार नाही, असे आरबीआयने सांगितले. बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने म्हटले की,
वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द करणे आणि दिवाळखोरीत गेल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
यानंतरच ठेवीदारांना विमा आणि कर्ज गॅरंटी मंडळाकडून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. याप्रकारे सहकारी बँकेचे जवळपास 99 टक्के खातेदार त्यांची जमा रक्कम काढू शकणार आहेत.
याआधी आरबीआयने मुंबईतील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक, कोल्हापूरमधील सुभद्रा लोकल एरिया बँक, जालन्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक,
साताऱ्यातील कराड जनता बँकेचे परवाने रद्द केले होते. त्यानंतर आता उस्मानाबादेतील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved