पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाला वेग! ‘या’ गावातील भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी सुरू

Ajay Patil
Published:
land aquisition

पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच आहे व त्यासोबतच एक आयटी हब म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणची वाढती लोकसंख्या पाहता महत्त्वाच्या अत्यावश्यक अशा पायाभूत सुविधांची उभारणी या ठिकाणी सुरू असून यामध्ये आपल्याला पुणे मेट्रोचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

त्यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता या ठिकाणी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या रिंग रोड साठीच्या आवश्यक प्रक्रिया सुरू झालेल्या असून यातीलच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचा जो काही प्रस्तावित रिंग रोड आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे व त्यासंबंधीचे अपडेट आपण या लेखात घेणार आहोत.

 पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए च्या प्रस्तावित असलेल्या रिंग रोडकरिता पहिल्या टप्प्यातील सोलु, वडगाव शिंदे आणि निरगुडी या तीन गावांपैकी वडगाव शिंदे या गावातील जमीन मोजण्याची प्रक्रिया भूसंपादनासाठी सुरू करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याकडून देण्यात आलेले आहे.

पीएमआरडीएच्या रिंग रोडकरिता पहिल्या टप्प्यातील भूसंपादन अंतर्गत सोलू, वडगाव शिंदे आणि निरगुडी या गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून  यापैकी वडगाव शिंदे या गावातील बाधित शेतकऱ्यांचे नुकतीच बैठक घेण्यात आली व त्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी या रिंग रोड करिता जमीन देण्याला अनुमती दर्शवली आहे.

त्यामुळे आता वडगाव शिंदे येथील एकूण 5.71 हेक्टर क्षेत्र रिंग रोडने बाधित होत असून त्याचे संयुक्त मोजणी मंगळवारपासून सुरू करण्यात आलेली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए च्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला रिंग रोड ८८.१३ किलोमीटर लांबीचा असून टप्प्याटप्प्याने त्याचे विकसन करण्याचे नियोजन असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 हे महत्त्वाचे एक्सप्रेस वे जोडले जाणार या रिंगरोडला

यातील पहिल्या टप्प्यात सोलो ते वाघोली पर्यंतचे म्हणजेच पुणे ते नगर रोड पर्यंत काम प्राधान्य क्रमाने हाती घेण्यात आले असून या टप्प्यातील सोलू व वाघोली रस्त्यामुळे पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे ते नगर रस्ता हे रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडला जोडले जाणार आहेत.

त्यामुळे या शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी होण्याला मदत होणार आहे. एवढेच नाही तर सोलू ते वडगाव शिंदे हा रिंग रोडचा भाग जो पुणे महापालिका हद्दीपर्यंत आहे तो पिंपरी चिंचवड प्राधिकरणामार्फत विकसित करण्यात येणार आहे तर पुणे महापालिका हद्दीतील वडगाव शिंदे ते लोहगाव ते वाघोली हा रिंग रोडचा 5.70 किलोमीटर चा भाग पुणे महापालिका विकसित करणार आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe