दहावीचे परीक्षा शुल्क परत करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- दहावीचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना त्वरीत परत करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांनी केली आहे.

पत्रकात देशमुख यांनी म्हटले, की राज्य सरकारने नुकताच १०वीची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी अंदाजे १७ लाख विद्यार्थी बसणार होते.

त्यांच्याकडून प्रत्येकी अंदाजे ४१५ रुपये इतके शुल्क आकारण्यात आले आहे. या माध्यमातून एकत्रितपणे अंदाजे ६८ कोटींपेक्षा जास्त रक्कम राज्य सरकारकडे जमा झाली आहे.

सरकार परीक्षा घेणार नसेल, तर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क का परत केले जात नाही? असा प्रश्न विद्यार्थी व पालक विचारत आहेत.

वास्तविक पहाता परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबरोबर परीक्षा शुल्क परत करण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेणे अपेक्षीत होते; परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही.

विद्यार्थ्यांच्या या पैशामध्ये तरी सरकारने पारदर्शकता ठेवावी व परीक्षा शुल्क त्वरीत परत करावे. १०वी परीक्षा रद्द केल्यावर आता १२वीची प्रवेश प्रक्रीया कोणत्या निकषांच्या आधारे केली जाणार आहे,

या बाबतचे धोरण अजूनही राज्य सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेले नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनात प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. सरकारने आता वेळ न दवडता भूमीका स्पष्ट करावी,

अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना तसेच निवेदन पाठविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!