अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील सामूहिक अत्याचारात बळी बालिकेचे स्नेहालय संस्थेत यशस्वी पुनर्वसन करण्यात आले.
याकामी बाल कल्याण समिती आणि अकोले पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. राहता तालुक्यातील राहणारे कुटुंब रोजंदारीसाठी अकोले येथे गेले होते.
येथील टाकळी व गर्दणी गावामधील विट भट्टीवर हे सर्व काम करीत होते. आई वडील वीटभट्टीवर कामाला गेले असताना ३ जणांनी या मुलीवर अत्याचार केले
. बदनामी आणि खुनाची धमकी देऊन याठिकाणी सातत्याने या बालिकेवर अत्याचार केले. येथे ५ महिने काम केल्यानंतर हे कुटुंब त्यांच्या गावी पुन्हा गेले. गावी गेल्यानंतर मुलीच्या पोटात दुखू लागले.
हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीमुळे मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेबाबत समजल्यावर स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने पाठपुरावा केला. राहता पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
अकोले पोलिसांनी तातडीने आरोपींवर कारवाई केली. स्नेहालयाने मुलीला बाल कल्याण समितीच्या आदेशाने स्नेहालय संस्थेत दाखल केले.
येथे मुलीस समुपदेशन, वैद्यकिय सेवा, रोजगार शिक्षण दिले जात आहे. तसेच तिच्या कुटुंबाचे ही पुनर्वसन केले जात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved