अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमधील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्य पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत .
जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रेखा जरे यांच्या कुटुंबाने घेतली आहे. या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा अद्यापही फरारच आहे.याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे?
पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही?कोणी त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे यांचा मुलगा रुणाल याने उपस्थित केले आहेत.
रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, रेखा जरे यांच्या मुलाच्या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी बाळ बोठे याला अटक करा या मागणीला जोर धरला आहे.
भूमाता ब्रिगेड तृप्ती देसाई यांनी रेखा जरे यांच्या मुलाच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अटक करा तसेच,
त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश द्या, आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना देखील अटक करा अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|