अहमदनगर :- किरकोळ कारणातून महिनाभरापूर्वी बसस्थानकासमोर मारहाण करण्यात आलेला तरुण प्रेम जगताप (वय २५, रा. स्टेशन रोड) याचा उपचारादरम्यान मंगळवारी (४ जून) मृत्यू झाला.
प्रेमच्या नातेवाईकांनीही याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करावी ,

तसेच आरोपीना अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला नाही, असा आरोप नातेवाइकांनी पोलिसांवर केला आहे.
या हल्ल्यात जखमी झाल्यामुळे प्रेमला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार चालू असताना तो कोमात गेला होता.
त्याला काल सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यानंतर प्रेमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेला 1 महिना उलटूनही एकाही आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी जबाबदार अधिकाऱयांवर कारवाईची मागणी केली आहे.
- एका मिनिटात 6 गोळ्या झाडणारी भारतीय तोफ! ऑपरेशन सिंदूरनंतर वाढली प्रचंड मागणी, वाचा तिची वैशिष्ट्ये
- जगातील सर्वात महागडा चहा! 1 किलोची किंमत तब्बल 9 कोटी, पाहा कोणत्या देशात मिळतो हा दुर्मिळ चहा?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! 2% नाही तर जुलै 2025 पासून ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, समोर आली मोठी अपडेट
- ३.५ लाख भाविकांनी घेतला वडापावचा आस्वाद खा. नीलेश लंके प्रतिष्ठानच्या महाप्रसादाला उदंड प्रतिसाद
- घरातील भिंतींवर चुकूनही ‘असे’ फोटो लावू नका, आयुष्यात वाढते गरीबी आणि अशांतता!
.