अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- ठाण्यात एका तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हे कृत्य तिच्या नातेवाईकानेच केल्याचे समोर आले आहे.
घोडबंदर परिसरातील ब्रम्हांड भागात गुरूवारी ही संतापजनक घटना घडली याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रम्हांड येथील तुर्फेपाडा परिसरात पीडित मुलगी तिच्या वडील, आजी, आत्या आणि आत्याचा नवरा यांच्यासह एकत्र राहत होते. गुरूवारी पीडित मुलगी एकटीच घराती असताना तिच्या आत्याच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला.
काही वेळाने मुलीची आजी घरी आल्यावर तिने आजीला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आजीने थेट पोलीस ठाणे गाठत कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलीस ठाण्यात या नातेवाईकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या नराधमाला अटकही केली आहे.