मुंबईत रहिवासी चाळ कोसळली, ढिगाऱ्याखाली नागरिक दबल्याची शक्यता

Ahmednagarlive24
Published:

मुंबई रविवारी पाहाटे ६ वाजता मुंबईतीत कांदीवली (पश्चिम) भागात रहिवासी चाळ कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या ढिगाऱ्याखाली 5-6 नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं (NDRF) एक पथक घटनास्थळी पोहोचलं असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

कांदीवली  (पश्चिम) गणेश नगरात ही घटना घडली आहे.

सबरिया मशिदीच्या मागे असलेली चाळचा ग्राउंड 2 चं स्ट्रक्चर कोसळलं आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना स्थानिकांनी बाहेर काढलं आहे.

मात्र, 5-6 रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. चाळममध्ये एकूण 14 नागरिक होते.

त्यापैकी 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

2 जण जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात आलं असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

आता कोणीही अडकलेले नसल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment