अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- तब्बल सहा महिन्यांनंतर नगर शहर व जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व बार ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था मात्र ३१ पर्यंत बंदच असतील.
सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, व्यापारी संकुलही बंदच राहतील. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी गुरुवारी जारी केले. ३१ पर्यंत जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले अाहे.
तीन महिन्यांपूर्वी दुकाने, बार, रेस्टॉरंटला केवळ पार्सलची परवानगी देण्यात आली होती. ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, फूडपार्क, रेस्टॉरन्ट आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सकाळी नऊ ते संध्याकाळी सात अशी वेळ देण्यात आली आहे. दरम्यान, नगर शहर व जिल्ह्यात दीड महिन्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाणदेखील काहीसे घटले आहे.
यापूर्वी दररोज ५०० ते ९०० रुग्ण आढळत होते. गुरुवारी ४०५ रुग्ण आढळले. यापूर्वी दररोज १० ते २५ जणांचा मृत्यू होत होता. गेल्या काही दिवसांत सहा किंवा सात जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved