प्लेक्स बोर्डवर ‘पोष्टरछाप’ पणा करणाऱ्यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला दणका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-फ्लेक्स बोड लावल्याने जिल्हयात अनेक वादाचे प्रसंग घडलेले आहेत. एवढेच काय तर वाढदिवस एकदिवस आणि फ्लेक्स बोर्ड लटकायचे महिनाभर अशाप्रकाराने नागरिकही या फ्लेक्स बोर्डला वैतागलेले आहे.

महापुरूष व देवापेक्षाही पोष्टरछाप वृत्तीचे कार्यकर्ते, पदाधिकारी फ्लेक्स बोर्ड लावून पोट भरून समाधान मिळवितात. मात्र जनता फ्लेक्सकडे पाहून काय काय म्हणते हे सांगायला नको.

दरम्यान कार्यकर्त्यांनी लावलेला बेकायदा फ्लेक्स बोर्ड काढायला लावून कारवाई करण्याचा दणका दिल्याने पोष्टरछाप उत्साही कार्यकत्यांना त्यामुळे चांगलीच चपराक बसली आहे.

ना. थोरातांच्या या भूमिकेचे जनतेतून स्वागत होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर दौऱ्यावर असलेले महसुलमत्री बाळासाहेब धोरात यांनी चक्क स्वत:या नववर्ष अभिनंदनाचा फ्लेक्स उतरवून,

हौशी कार्यकत्यांच्या अवैध बॅनरबाजीला कडाडून विरोध केला. संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून भच्य बसस्थानक साकारले आहे.

मात्र या बसस्थानकाच्या समोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी केली जाते. त्यामुळे बसस्थानकाचे विद्रुपीकरण होते. महसूलमंत्री काल बसस्थानकासमोरून जात असताना त्यांच्या ही बाबा लक्षात आली,

शिवाय तेथे असलेल्या बॅनरवर त्यांचेच फोटो होते. त्यांनी गाडी थांबवून त्यांच्या फोटोचे फ्लेक्स तत्काळ उतरविण्याच्या सूचना सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना केल्या. त्यांनतर फ्लेक्स उतरले गेले. दरम्यान,

मंत्री थोरात यांच्या या अनपेक्षित कृतीमुळे बसस्थानक परिसर अवैध बॅनर्सपासून मुक्त झाला. महसूलमंत्र्यांच्या या निर्णयामुळे समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्या कृतीचे कौतुक होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment