अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर बलात्कार पीडितेच्या परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली.

या घटनेविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
यूपीमध्ये गुंडाराज आहे. यूपी पोलिसांनी राहुल गांधी यांना अशा पद्धतीनं अडवणं चुकीचं आहे. या घटनेचे राज्यात पडसाद उमटू शकता, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्या या पाशवी वृत्तीचा अनुसूचित जाती जमातीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी देखील तीव्र शब्दात निषेध केला आहे.
हाथरस येथे जात असतांना राहुल गांधी यांची पोलिसांनी कॉलर धरली व धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले, ही घटना अतिशय निंदनीय असून याचा तीव्र शब्दात डॉ राऊत यांनी निषेध नोंदवला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved