अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्या होणार्या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्यातील दक्षिणेमधून चार आमदार असल्याने एका आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. आज मुंबईत सायंकाळी सुरू असलेली बैठकीत ही सकारात्मक चर्चा झाली आहे.
आज मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित असून नगर जिलाह्याबाबत कोणाला मंत्रीपद द्यावयाचे याबाबत चर्चा झाली असून नगर दक्षिणेमध्ये चार आमदार तर उत्तरे मध्ये दोनच आमदार आहेत या तुलनेत दक्षिणेचे पारडे जड असून एका चांगल्या आमदाराला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी द्यावी अशी सर्वानुमते बैठकीत सूर निघाला आहे.

त्यादृष्टीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सकारात्मक विचार केला असून आज रात्री दक्षिणेतील एका आमदाराला तातडीचा फोन येणार आहे. यामध्ये आमदार रोहित पवार किंवा संग्राम जगताप या दोघांपैकी एका आमदाराला मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
उत्तरेचा विचार केला तर उत्तरेत काँग्रेस पक्षाकडून कॅबिनेट मंत्री म्हणून यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली आहे, त्यामुळे जिल्ह्याचा समतोल ठेवण्याच्या दृष्टीने आता राष्ट्रवादीकडून मंत्रिपद उत्तरेला न देता दक्षिणेला द्यावे हा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे समजते.
दक्षिणेतून पवार केव्हा जगताप यापैकी एका आमदाराची मंत्रिपदासाठी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आमदार आमदार जगताप यांचे नाव आघाडीवर असून ते जुने आमदार असल्याने त्यांच्याच नावावर सकारात्मक चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे, मात्र अंतिम निर्णय बैठकीतून बाहेर आलेला नसल्याचे एका बड्या नेत्याने सांगितले आहे. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादी च्या नेत्यांशी चर्चा केली असता अद्याप कोणीही या भूमिकेबाबत स्पष्टपणे बोलताना दिसत नाही.