अहमदनगर :- कर्जत-जामखेड विधानसभेची जागा राष्ट्रवादीसाठी न सोडण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत झाला आहे.
ह्या जागेवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार लढण्यास इच्छुक आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पवारांची अडचण होणार आहे.

जिल्ह्यात काँग्रेसकडे पाच जागा असून शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, नगर शहर व कर्जत-जामखेड अशा या पाच जागांपैकी नगर शहरात राष्ट्रवादीचा आता आमदार असल्याने ही जागा राष्ट्रवादीलाच ठेवण्याचे ठरवले गेले आहे.
मात्र कर्जत-जामखेडची जागा राष्ट्रवादीला न देता काँग्रेसने स्वतः लढवायची ठरवली आहे. मुंबईच्या बैठकीत जिल्ह्यात चार जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान काँग्रेसच्या या निर्णयामुळे रोहित पवारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह असून पवारांसह राष्ट्रवादीची अडचण होण्याची चिन्हे आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांचे प्रमुखनेते व पदाधिकाऱ्यांशी या बैठकीत संवाद साधण्यात आला.
नगर जिल्ह्यातून आमदार थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख व युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.
- Explained : विखे-थोरात पुन्हा समोरासमोर ? ZP निवडणुकीत लागणार खऱ्या ताकदीचा कस
- साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत खा. नीलेश लंके यांची भारतीय लष्करासाठी प्रार्थना
- नवीन कार खरेदी करण्यासाठी SBI कडून 15 लाखाचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- IDBI Bank मध्ये 676 पदांची जंम्बो भरती; पात्रताही अशी की अनेकांना भरता येणार अर्ज
- चार्गिंगचं झंझट संपलं… आला 10000 mAh बॅटरीवाला फोन; प्रोसेसरही असा की, चालतो दणादण