अहमदनगर : – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना त्यांच्या पक्षाचे ‘महिला धोरण’ अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
याच मतदार संघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनीही या पदावर दावा केला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रस्सीखेच सुरू असताना आता प्रदेशाध्यक्ष चाकण याही महिलांची बाजू घेऊन गुंड यांच्या मागे उभ्या रहिल्या आहेत.
चाकणकर आज नगरला आल्या होत्या. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले, ‘यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी जास्तीतजास्त जागा आम्ही मागणार आहोत व कर्तृत्ववान महिलांना संधी देणार आहोत.
नगरच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी उमेदवारी मागितली असली तरी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. मात्र, आपण महिलांना संधी द्यावी, अशी शिफारस वरिष्ठांकडे करणार आहोत. असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













