अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- २०१९ ची विधानसभा सर्वानीच अनुभवली. यात अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या. यात अनेक ठिकाणी मंत्री असलेले नेतेही पराभूत झाले.
‘कर्जत जामखेड मतदार संघातही तेच झाले. रोहित पवार यांनी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रा. शिंदे यांनी कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले.
ते म्हणाले मधील मतदारांनी पवार कुटुंबीयांवर विश्वास ठेवून आमदार रोहित पवार यांना निवडून दिले. मात्र, आतापर्यंतच्या काळात त्यांनी उल्लेख करावा असे एकही भरीव काम केले नाही.
उलट बारामती भागातील आपल्या कंपन्या व संस्थांच्या वस्तू येथे आणून विकण्याचा व्यापारच वाढविला, येथे सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी बारामती भागातील कंपन्या आणि संस्थांचा विविध प्रकारचा माल येथे आणून विकण्यास सुरुवात केली आहे.
कोंबड्यांची पिल्ले, पिठाच्या गिरण्या, स्वत: च्या नावाचे मास्क, झाडांची रोपे, माशांची बिजे अशा अनेक वस्तू येथे आणून विकल्या जात आहेत. एकवेळ हे करण्यास हरकत नाही.
मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्याचेही कर्तव्य असते, हे लक्षात ठेवले पाहिजे.’ असा आरोप भाजप नेते व माजी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.
पवार कुटुंबीयांना पन्नास वर्षांच्या कामाचा वारसा असल्याचे सांगतात, पण येथे तो दिसून येत नाही. त्यामुळे वर्षपूर्तीच्यावेळी आपण काय कमावले, काय गमावले याचा येथील मतदारांनी विचार केला पाहिजे’, असे आवाहन शिंदे यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved